एका पीडितेचे महिला आयोगाला पत्र; कारवाई सुरू
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका पदवी महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या मोबाईल फोनमधून 65 अश्लील व्हिडिओ सापडले. सदर प्राध्यापकाने 20 वर्षांत 30 हून अधिक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी एका पीडित विद्यार्थिनीने महिला आयोगाला पत्र लिहित अत्याचारा वाचा फोडली. त्यानंतर महिला आयोगाने चौकशी दिले आणि हे प्रकरण उजेडात आले. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले की, बहुतेक व्हिडिओ महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे होते. तसेच प्राध्यापकाने विद्यार्थिनींचे अनेक व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड केले होते. सध्या आरोपी प्राध्यापक महावीर सिंह फरार आहे. महाविद्यालयीन व्यवस्थापनाने त्याला निलंबित केले आहे. त्याच्या अटकेसाठी 3 पथके तैनात केली आहेत. हे प्रकरण बागला पदवी महाविद्यालय (अनुदानित) शी संबंधित आहे.
सविस्तर माहितीनुसार, 6 मार्च रोजी एका विद्यार्थिनीने महिला आयोगाला पत्र लिहिले आणि अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवले. तक्रार समोर आल्यानंतर पोलिसांनी अंतर्गत चौकशी सुरू केली. यानंतर 13 मार्च रोजी पोलीस निरीक्षक सुनील कुमार यांनी स्वतः तक्रार दाखल केली. यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणी चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती स्थापन केली आहे.