राज्यासाठी नवीन प्रादेशिक आराखडा तयार करा ः आप

0
2

गोवा सरकारने राज्याच्या भल्यासाठी नवा प्रादेशिक आराखडा तयार करावा. त्यासाठी तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालील एक समिती स्थापन केली जावी व जनतेशी चर्चा करून व त्यांच्या सूचना व आक्षेप विचारात घेऊन हा नवा प्रादेशिक आराखडा तयार केला जावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर यांनी वरील मागणी केलेली असून वादग्रस्त 17(2) ही नगर नियोजन कायद्यातील वादग्रस्त दुरुस्ती लक्षात घेऊन या खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही पालेकर यांनी केली आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सुंदर अशा गोव्याचे वाढत्या भू-रुपांतरांमुळे वाळवंटात रुपांतर होण्यास वेळ लागणार नसल्याचा इशारा पालेकर यांनी दिला आहे. काही वर्षांपूर्वी नव्या प्रादेशिक आराखड्यासाठी राज्यातील जनतेने आंदोलन केले होते, हे सरकारने विसरू नये, असेही म्हटले आहे.