राज्य सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल संचालनालयाने व्यावसायिक आणि खासगी कार्यक्रमांमध्ये ध्वनिक्षेपक वापरासाठी शुल्क निश्चित करणारी अधिसूचना जारी केली आहे. व्यावसायिक कार्यक्रमांसाठी 15 हजार ते 21 हजार दरम्यान शुल्क आकारले जाणार आहे, तर खासगी कार्यक्रमांसाठी 3 हजार ते 5 हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सरकारी, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमांत ध्वनिक्षेपक वापरासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. यासंबंधीची सूचना खात्याचे संचालक सचिन देसाई यांनी जारी केली आहे.