आधार कार्ड प्रणालीनेच योजनांची रक्कम जारी करा

0
5

सरकारच्या कल्याणकारी व सामाजिक योजनांची प्रलंबित रक्कम वितरित करताना आधार कार्ड प्रणालीचा वापर करण्याचे आदेश गोवा सरकारच्या वित्त खात्याने काल एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. विविध खात्यांकडून त्या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सरकारने काल काढलेल्या परिपत्रकाद्वारे आधार कार्ड प्रणालीचा वापर करण्याच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे वित्त खात्याने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.