वीज खात्याच्या वीज खांबावरील केबल कापल्या प्रकरणी इंटरनेट सेवा प्रदात्यांनी नवीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली आहे. या नवीन याचिकेमध्ये कार्यकारी अभियंत्याला थकित भाड्याच्या वसुलीसाठी डिमांड नोटीस जारी करण्याच्या अधिकाराला आव्हान देण्यात आले आहे. राज्य वीज विभागाने केबल कापून टाकण्याची मोहीम सुरू केल्यानंतर इंटरनेट सेवा प्रदात्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता नवीन याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यांनी यापूर्वी दाखल केलेली याचिकेवर काल सुनावणी घेण्यात आली.