साबांखामध्ये होणार 364 जणांची भरती

0
2

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामगार पुरवठा सोसायटीमध्ये रोजंदारीवर 364 कामगारांची भरती केली जाणार आहे. या सोसायटीमध्ये कुशल, अकुशल आणि निमकुशल अशी विभागात कामगारांची भरती केली जाणार आहे. या सोसायटीमध्ये 213 कुशल कामगारांची निवड केली जाणार असून ,त्यांना प्रतिदिन 650 रुपये वेतन दिले जाणार आहे. 8 निमकुशल कामगारांची भरती केली जाणार असून, प्रतिदिन 595 रुपये वेतन आणि 143 अकुशल कामगारांची भरती केली जाणार असून त्यांना प्रतिदिन 534 रुपये वेतन दिले जाणार आहे. या नोकरभरतीसाठी 28 मार्च 2025 पर्यत अर्ज सादर केले जाऊ शकतात. पीडब्लूडी सोसायटीमध्ये प्लंबर, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मीटर रीडर, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, असिस्टंट प्लंबर, हेल्पर, स्वीपर, वॉचमन, पंप अटेडंट, चालक (हलके वाहन), कामगार आदी जागांची भरती केली जाणार आहे. या सोसायटीमध्ये सध्या 1 हजाराहून अधिक कामगार विविध पदावर काम करीत आहेत.