पूजा नाईकविरुद्ध आरोपपत्र दाखल

0
3

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणात संशयित आरोपी पूजा नाईक हिच्याविरोधात 120 पानांचे आरोपपत्र पणजी पोलिसांनी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले आहे. पणजी परिसरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर आहे. या प्रकरणी पोलिसांनी पूजा नाईक हिला अटक करून तपास केला होता.