उड्डाणपुलाचा बॅरिकेड अंगावर कोसळून वीज कर्मचारी ठार

0
4

दाबोळी येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचा लोखंडी बॅरिकेड अंगावर पडल्याने वीज विभागातील स्वप्नील चिंदरकर (30, रा. हेडलँड-सडा) या कर्मचाऱ्याचा काल मृत्यू झाला. या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरलेल्या जेसीबीचालक चंद्रशेखर प्रसाद याला पोलिसांनी अटक केली. स्वप्नील चिंदरकर हे काल दुपारी दाबोळी येथील विशाल मेगा मार्टजवळून दुचाकीवरून (जीए 06 आर 3129) घरी जात होते. त्यावेळी दाबोळीतील उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या जेसीबीने बॅरिकेडला धडक दिल्याने तो बॅरिकेड चालत्या दुचाकीवर पडला आणि त्याबरोबर स्वप्नील चिंदरकर हे खाली कोसळले, असा स्थानिकांचा आरोप आहे. त्यांना लगेचच चिखली रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी जेसीबी चालकाला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले व अटक केली आहे.