कुर्टीतील अपघातात दुचाकीचालक जागीच ठार

0
3

हाऊसिंगबोर्ड-कुर्टी येथील राष्ट्रीय महामार्गावर काल दुपारच्या सुमारास दुचाकीची धडक दुभाजकाला बसून चंद्रकिशोर नानकवा पासवान (48, सध्या रा. दोन खांब-कवळे) याचा जागीच मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मृतदेह मडगाव येथील हॉस्पिटलमध्ये पाठवला.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 1.40 वाजण्याच्या सुमारास जीए-05-क्यू -6076 क्रमांकाची दुचाकी घेऊन चंद्रकिशोर पासवान हा खांडेपारच्या दिशेने जात होता. हाऊसिंगबोर्ड येथे पोचल्यानंतर ताबा गेल्याने दुचाकीची धडक दुभाजकाला बसली. यावेळी दुचाकीचालकाने हेल्मेट परिधार केले होते; मात्र दुचाकीवरून कोसळल्यानंतर त्याचे डोके मोबाईल टॉवरच्या लोखंडी कुंपणावर आदळले. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक बंसल नाईक यांनी पंचनामा केला.