धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा

0
2

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर काल महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल धनंजय मुंडे यांनी आपल्या पीए आणि ओएसडींच्या मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो तत्काळ स्वीकारला.

9 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या शिवारात सापडला. या तीन तासांत संतोष देशमुख यांना नरकयातना दिल्या गेल्या. आरोपींनी कशा पद्धतीने संतोष देशमुखांना हालहाल करुन मारले, त्याचे फोटो काल व्हायरल झाले. ते पाहून अनेकांचे मन हळहळले.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो बाहेर आल्यानंतर बीड आणि लातूरमध्ये लोकांच्या भावनांचा उद्रेक पाहायला मिळाला.