फर्मागुडीत 65 कोटी खर्चून वस्तुसंग्रहालय उभारणार

0
3

फर्मागुडी-फोंडा येथे गोवा सरकार 65 कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वस्तुसंग्रहालय उभारणार आहे. केंद्र सरकारच्या भांडवली गुंतवणुकीसाठीच्या विशेष सहाय्य या योजनेखाली त्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या वस्तुसंग्रहालयासाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाने 64,91,34,151 रुपयांची निविदा काढली आहे. एका वर्षाच्या आत हा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे.