राज्य सरकारच्या वाहतूक खात्याकडून खासगी वाहने भाडेपट्टीवर देणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने भाडेपट्टीवर दिली जात असल्याचे आढळून येत आहे. गोवा पोलिसांनी सुध्दा खासगी वाहने भाडेपट्टीवर देणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविली होती. पर्यटकांना खासगी कार आणि दुचाकी वाहने भाडेपट्टीवर दिली जात आहेत. वाहन भाडेपट्टीवर देण्याच्या पहिल्या गुन्ह्यासाठी वाहन ताब्यात घेऊन 10 हजार रुपये दंड ठोठावून वाहनाचा परवाना निलंबित केला जाणार आहे. दुसऱ्या उल्लंघनासाठी वाहन ताब्यात घेऊन परवाना रद्द केला जाणार आहे.