म्हादई जलतंटा लवादाला आणखी 6 महिने मुदतवाढ

0
3

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने म्हादई जलतंटा लवादाला आणखी 6 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यातील म्हादई नदीतील पाणी वाटपाचा वाद सोडविण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर 2010 मध्ये म्हादई जलतंटा लवादाची स्थापना केली होती. या लवादाने ऑगस्ट 2018 मध्ये पाणी वाटपासंबंधी आपला निवाडा जाहीर केला आहे. म्हादई जलतंटा लवाद मागील 14 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असूनही पाणी वाटप समस्येचे निराकरण करण्यात अजूनपर्यंत यश आलेले नाही. तिन्ही राज्यांनी लवादाच्या निवाड्याला आव्हान दिले आहे. या लवादाला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली असून आता आणखी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ही मुदतवाढ 16 फेब्रुवारी 2025 पासून सहा महिन्यांसाठी देण्यात आली आहे, असे ‘जलशक्ती’ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.