पर्वरीतील ‘तो’ वड हटवण्यास परवानगी

0
3

पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे जुना वड दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मान्यता काल दिली. सदर वड दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करताना तज्ज्ञांच्या सूचना विचारात घेण्यात येणार आहेत, अशी ग्वाही सरकारने दिली. स्थानिकांनी वडाचे झाड वाचविण्यासाठी चळवळ सुरू केली होती. या वडाच्या झाडासंबंधीची याचिका निकालात काढण्यात आली आहे.