आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या आकस्मिक भेटीनंतर उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात नवीन वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती काल करण्यात आली. या इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सानिया नाईक यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी नवीन वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. वर्षा मुंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे.