मुख्यमंत्री सावंत यांची केरळ राज्याला भेट

0
2

>> रामा काणकोणकर, पणजी पोलीस स्थानकात हजेरी

सरकारने माझा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात त्यांना यश येणार नाही, असे काल अनुसूचित जमातींतील समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांनी सांगितले. काल सकाळी पणजी शहर पोलीस स्थानालगत हजेरी लावण्यासाठी आले असता आझाद मैदानावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत
होते.

माझा आवाज दाबण्याचे सरकारने कितीही प्रयत्न केले तरी आपण सरकारसमोर झुकणार नसल्याचे ते म्हणाले. आपण लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध लढा देत असून त्यामुळे आपणाला कुणाला घाबरण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले. आपणाला जेव्हा अटक झाली तेव्हा आपण सहा महिनेसुद्धा तुरूंगात राहण्याची तयारी ठेवली होती, असेही ते म्हणाले.
जामीन मिळाल्यानंतर पणजी पोलीस स्थानकावर हजेरी लावण्याची जी अट घालण्यात आलेली आहे त्या अटीनुसार काल काणकोणकर यांनी पणजी शहर पोलीस स्थानकावर हजेरी लावली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रश्नावरून पणजी पोलिसांनी काणकोणकर यांना अटक केली होती. तद्नंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.
सरकारने राज्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यात त्यांना यश येणार नसल्याचे काणकोणकर यांनी पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सांगितले. यावेळी एसटी समाजाचे नेते रूपेश वेळीप, प्रेमानंद नाईक, तनोज अडवलपालकर आदी उपस्थित होते.