स्मार्ट सिटीच्या रस्ते, पदपथांच्या कामांसाठी न्यायालयाची मुदतवाढ

0
2

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल स्मार्ट सिटीतील रस्ते आणि पदपथांचे काम पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.
स्मार्ट सिटी पणजीतील सर्व रस्त्यांची कामे येत्या 31 मार्च 2025 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. तसेच, पदपथ तयार करण्याचे काम 30 जून 2025 पर्यंत पूर्ण केले जाणार आहे, असे प्रतिज्ञापत्र स्मार्ट सिटी प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केले असून न्यायालयाने प्रतिज्ञापत्र स्वीकारून रस्त्याची कामे 31 मार्च आणि पदपथाचे काम 30 जून या दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
स्मार्ट सिटीतील कामासंबंधी याचिकेवर काल झाली. बहुतांश रस्त्याची कामे हाती घेतल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाने विविध ठिकाणी रस्त्यांच्या कामांना गती दिली आहे. स्मार्ट सिटी प्रशासनाने रस्ते आणि पदपथाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. न्यायालयाने प्रतिज्ञापत्र स्वीकारले आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.