गोव्यातून मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेखाली प्रयाग राज येथे महाकुंभ मेळाव्याला गोव्यातून गेलेल्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सदर व्यक्तीचे नाव रामा पेडणेकर असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेखाली 15 फेब्रुवारी रोजी मडगाव येथून खास रेल्वेने 1500 यात्रेकरू गेले होते. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीत त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने इस्पितळात नेले होते. तेथेच त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. कुंभमेळ्यात गेलेली रेलगाडी काल दि. 18 रोजी परतली.