म्हादई प्रवाह समितीची चौथी बैठक 4 रोजी मुंबईत होण्याची शक्यता

0
3

म्हादई प्रवाह समितीची चौथी बैठक येत्या 4 मार्च 2025 रोजी मुंबईत होण्याची शक्यता आहे. गोवा सरकारच्या म्हादई नदीच्या संयुक्त पाहणीच्या अर्जावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, म्हादई नदीवरील गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या लघू प्रकल्प तसेच पिण्याच्या पाण्यासाठी नियोजित प्रकल्पांवर चर्चा होण्याचा अंदाज आहे. मुंबई येथे होणाऱ्या बैठकीबाबत संबंधित राज्यांना माहिती पाठविण्यात आली आहे.
गोवा सरकारने म्हादई नदीवरील प्रस्तावित कळसा, भांडुरा नाला प्रकल्पाची संयुक्त पाहणी करण्याची मागणी एका अर्जाद्वारे केली आहे. म्हादई प्रवाहच्या यापूर्वीच्या बैठकीत गोवा सरकारच्या अर्जावर चर्चा झाली होती. त्यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून सल्ला घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.