पर्यटन क्षेत्रात गुंडगिरी खपवून घेणार नाही : आलोक कुमार

0
3

गोवा हे शांतताप्रिय राज्य आहे. पर्यटकांनी कोणताही अडथळा न आणता जबाबदारीने गोव्याच्या सौंदर्याचा आनंद घ्यावा. तसेच, पर्यटन क्षेत्रातील संबंधितांनी देखील जबाबदारीने वागले पाहिजे. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी आल्तिनो-पणजी येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिला.

गोवा या शांततापूर्ण राज्यात पर्यटक आणि पर्यटन क्षेत्रातील संबंधितांकडून कोणत्याही प्रकारच्या गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. पर्यटकांनी शांततेत अडथळा न आणता सुट्टीचा आनंद घ्यावा. कुठल्याही प्रकारची अडचण, समस्या निर्माण झाल्यास थेट पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन आलोक कुमार यांनी केले. राज्यात शांतता कायम राखण्यासाठी किनारी भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. सांगोल्डा साळगाव येथे नुकत्याच घडलेल्या एका घटनेनंतर त्यांनी हा इशारा दिला. या ठिकाणी दोन पर्यटकांनी एका स्थानिक कारचालकावर हल्ला केला होता. गेल्या 6 फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच त्या पर्यटकांना अटक करण्यात आली होती. पर्यटकांनी भाड्याने घेतलेल्या दुचाकीला कार धडकल्यानंतर त्यांनी कारचालकावर हेल्मेटने हल्ला केला होता.