कैद्याने कैद्याच्या डोळ्यात खूपसले पेन

0
3

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात सोमवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा कैद्यांमध्ये राडा झाला. एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोळ्यात पेन खूपसून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात कैदी अझीज असिफ हा गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या अझीज असिफ यांने सांगितले की, हल्लेखोराने आपल्यावर कशासाठी हल्ला केला हे आपणास माहिती नाही. मी झोपलेलो असताना अचानक पेनाच्या साहाय्याने संशयिताने माझ्यावर हल्ला चढवला, असे त्याने सांगितले. या हल्ल्यात अझीज असिफ याच्या डाव्या डोळ्याला व चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. त्याला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.