हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आणि प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बरोली यांच्याविरुद्ध सरकारमधीलच एक ज्येष्ठ मंत्री अनिल विज यांनी वक्तव्य केल्याने वाद शिगेला पोहोचला आहे. सामूहिक बलात्कारप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर अनिल विज यांनी गेल्या दोन महिन्यांत दोनदा मोहनलाल बरोली यांचा राजीनामा मागितला होता. त्याच वेळी, त्यांनी सतत मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला होता. आमचे मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री झाल्यापासून हवेत आहेत, असे खोचक वक्तव्य अनिल विज यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपने मंत्री अनिल विज यांना काल कारणे दाखवा नोटीस बजावली. वादग्रस्त विधानांबद्दल पक्षाने त्यांच्याकडून 3 दिवसांत उत्तर मागितले आहे.