काँग्रेस पक्षाकडून सतत राजीनामा देण्यासाठी आलेल्या दबावामुळेच मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला असल्याचे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मणिपूरचे प्रभारी गिरीश चोडणकर यांनी सांगितले. मणिपूरमधील हिंसाचाराला जबाबदार धरून सिंह यांच्यावर न्यायालयात खटला दाखल करायला हवा अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे. श्री. सिंह यांनी 12 महिन्यांपूर्वीच जर राजीनामा दिला असता तर मणिपूरमधील हिंसाचार तेव्हाच थांबला असता असा दावा यावेळी चोडणकर यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाने आज सोमवारी मणिपूर विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अविश्वास ठराव आणण्याची सगळी तयारी केली होती, अशीही माहिती यावेळी चोणडकर यांनी दिली.