- कु. लक्षिता परब
इयत्ता ः सहावी, शारदा माध्यमिक विद्यालय,
कासारवर्णे, पूर्वा, पेडणे- गोवा.
भारतातील तीन मुख्य ऋतूंपैकी नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान येणारा ऋतू म्हणजे हिवाळा होय. या ऋतूला पानगळीचा ऋतू असेही म्हटले जाते. या ऋतूत निसर्गातील वातावरण आल्हाददायक असते. या काळात थंडीचे वातावरण असते. दिवस लहान व रात्र मोठी असते. हा कालावधी सण-उत्सवांचा हंगाम म्हणूनही ओळखला जातो. याला शरद ऋतू असेही म्हणतात. सकाळी सकाळी धुक्यामध्ये रस्ते झाकले जातात. धुक्यामुळे कधीकधी सूर्याचे दर्शनही होत नाही.
हिवाळा हा माझा आवडता ऋतू आहे. कारण या ऋतूत वातावरण खूप प्रसन्न असते. या प्रसन्नतेतून आपल्याला अधिऊर्जा व क्रियाशीलता प्राप्त होते. या काळात नवीन पिकांची लागवड होते. या ऋतूत भाजीपाला जास्त पिकतो. निसर्ग सौंदर्याने भारून आणि भरून जातो. त्यामुळे आपले मन शांत आणि आनंदित राहते. आपल्या आरोग्यासाठी हे वातावरण खूप पोषक असते. म्हणूनच या ऋतूच्या दरम्यान आमच्या शाळेत विविध प्रकारचे खेळ, कवायती, योगासने यांचा सराव आमच्याकडून नेहमीपेक्षा जरा जास्तच करून घेतला जातो. यामुळे आमचे शारीरिक आरोग्य सुदृढ बनते. रोग प्रतिकारशक्ती वाढते, आपण निरोगी राहतो, म्हणूनच हा हिवाळा ऋतू मला फार फार आवडतो.