ओडीपी : सरकारची याचिका फेटाळली

0
3

कळंगुट, कांदोळी, हडफडे, नागोवा आणि पर्रा या बाह्य विकास आराखड्यानुसार (ओडीपी) बांधकामांवर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने लागू केलेल्या अंतरिम बंदीला आव्हान देणारी गोवा सरकारची नवीन विशेष याचिका (एसएलपी) सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळली. आता, या प्रकरणी उच्च न्यायालयात येत्या 20 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारची याचिका स्वीकारण्यास काल नकार दिला. गोवा सरकारने 23 जानेवारीला दिलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यासाठी 31 जानेवारी 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात एसएलपी दाखल केली होती. याचिका फेटाळल्याने आता उच्च न्यायालय अंतिम सुनावणी 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.