पॅराग्लायडिंग दुर्घटना; मालकाला 1 लाखाचा दंड

0
2

केरी-पेडणे येथील पॅराग्लायडिंग दुर्घटने प्रकरणी पॅराग्लायडिंग कंपनीचा मालक श्याम नारायण पांडे याला पर्यटन खात्याने 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केरीतील बेकायदा पॅराग्लायडिंग दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता, त्यात एका पर्यटकाचा समावेश होता. पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. या दुर्घटनेनंतर राज्यात पॅराग्लायडिंगवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असून, पॅराग्लायडिंग परवान्यांसाठी अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे.