मुझफ्फरपूर अपघातात 5 नेपाळी भाविक ठार

0
2

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यावरून परतणाऱ्या नेपाळमधील पाच भाविकांचा बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यात मधुबनी येथील चारपदरी बगल महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दुचाकीवर स्टंट करत असलेल्या व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नात या भाविकांची गाडी रस्ता दुभाजकाला धडकून पाच वेळा पलटली. शनिवारी झालेल्या या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर दुचाकीचालक घटनास्थळावरून पळून गेला. या अपघातात तीन महिला आणि दोन पुरुष जागेवरच ठार झाले. मृतांमध्ये अर्चना ठाकूर, इंदू देवी, मंतरणी देवी, बाळकृष्ण झा आणि कारचालकाचा समावेश आहे, तर मनोहर ठाकूर, श्रृष्टी ठाकूर, कामिनी झा आणि देवतरण देवी हे जखमी झाले.