अभिभाषणावरील टीकेवरून वादंग

0
4

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी द्रौपदी मुर्मूंना ‘पुअर लेडी’ म्हटले. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेसने राष्ट्रपतींचा अपमान केला. ओरिसातील एका गरीब कुटुंबातून त्या या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी नाही, उडिया भाषेत लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनी आज संसदेत उत्कृष्ट भाषण केले. पण काँग्रेसच्या राजघराण्याने त्यांचा अपमान केला, असे मोदी म्हणाले.