अमेरिकेतील विमान अपघातात 30 ठार

0
4

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास एक प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर झाली. अपघातानंतर दोन्ही विमाने पोटोमॅक नदीत पडली. विमानात 4 क्रू मेंबर्ससह 60 प्रवासी होते. हेलिकॉप्टरमध्ये 3 जण होते. या सर्व लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाचे पोटोमॅक नदीत तीन तुकडे पडलेले आढळले. आतापर्यंत 30 मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. यूएस एअरलाइन्सचे सीआरजे700 बॉम्बार्डियर जेट आणि लष्कराचे ब्लॅक हॉक (एच60) हेलिकॉप्टर यांच्यात हा अपघात झाला.