राज्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार (आयपीएस) यांनी पर्यटन उद्योगातील प्रमुख भागधारकांची पोलीस मुख्यालयातील परिषद सभागृहात काल बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील नागरिक आणि पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांवर भर द्यावा, असे सूचित करण्यात आले. याशिवाय रस्ता सुरक्षा, सायबर जागृती आणि विदेशी नागरिकाचां उपद्रव या समस्यांवर चर्चा केली.
राज्यात अपघातांचे वाढते प्रमाण, सायबर गुन्ह्याची वाढती संख्या या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाचे अध्यक्ष जॅक सुखिजा, आकाश मडगावकर, विनय अल्बुकर्क, गोवा वाईन स्टोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक व इतरांनी सहभाग घेतला. यावेळी पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग, सायबर व गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनीता सावंत, वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक प्रबोध शिरवोईकर, ईओसीच्या अधीक्षक अर्शी आदिल आणि इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.