भांडवली गुंतवणुकीसाठी गोव्याला केंद्राकडून 200 कोटी ः राणे

0
2

केंद्र सरकारने गोव्याला भांडवली गुंतवणुकीसाठी 200 कोटी रु. मंजूर केले आहेत. राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी देण्यात येत असलेल्या विशेष साहाय्य योजनेखाली हा निधी 2024-25 ह्या वर्षासाठी मिळाला आहे. केंद्राकडून मिळालेल्या या निधीमुळे राज्यातील नगरविकासाच्या कामांना चालना मिळणार असल्याचे राज्याचे नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांनी काल सांगितले. सदर योजनेतील मार्गदर्शक तत्त्वांनुसार या निधीचा योग्य प्रकारे वापर करून कामे केली जाणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. 2023-24 ह्या वर्षासाठी केंद्राने वरील योजनेखाली गोव्याला 386 कोटी रु. मंजूर केले होते. आणि त्यापैकी 224.77 कोटी रु. वितरित केले होते. तर 2022-23 ह्या वर्षी 562.75 रु. मंजूर करून वितरित केले होते. तर 2021-22 या वर्षी केंद्राने वरील योजनेखाली गोव्याला 111.04 कोटी रु. मंजूर करून वितरित केले होते, अशी माहिती मंत्री राणे यांनी यावेळी दिली.