राहुल गांधींच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याबाबत आसाममधील गुवाहाटी येथील पान बाजार पोलीस ठाण्यात शनिवारी एफआयआर दाखल करण्यात आला. राहुल यांनी भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणणारी विधाने केल्याचा एफआयआरमध्ये आरोप आहे. तक्रारदार मनोज चेतिया यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याने स्वीकारार्ह भाषणाची मर्यादा ओलांडली आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे असल्याचे म्हटले आहे. 15 जानेवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी राहुल गांधी यांनी, भाजप आणि आरएसएसने प्रत्येक संस्था काबीज केली आहे. आता आम्ही भाजप-आरएसएस आणि भारतीय राज्याशी लढत असल्याचे म्हटले होते.
राहुल यांच्या या वक्तव्यामुळे हिंदू सेनेने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे तक्रार करत राहुल यांच्यावर कारवाई व्हावी असे लिहिले होते.