>> सुरक्षा दलासोबत अद्यापही चकमक सुरूच
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात काल गुरुवारी (दि.16) सुरक्षा दलांशी झालेल्या भीषण चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. दक्षिण विजापूरच्या जंगलात सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही चकमक झाल्याचे त्यांनी सांगितले. संध्याकाळपर्यंत ही गोळीबार सुरूच होता. दरम्यान, यानंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एक हजार सैनिकांचा सहभाग आहे. जवानांनी 50-70 नक्षलवाद्यांना घेरल्याची माहिती असून आयजी पी सुंदरराज यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काल गुरूवारी सकाळी 9 वाजता जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. विजापूर-सुकुमाचे डीआरजी सैनिक, सीआरपीएफच्या 5 कोब्रा युनिट्स, सीआरपीएफच्या 229 व्या बटालियनचे जवान या ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत.
विजापूर, डीआरजी सुकमा, डीआरजी दंतेवाडा, कोब्राच्या वेगवेगळ्या बटालियन आणि सुमारे 1200 ते 1500 सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. प्राथमिक माहितीनुसार चकमकीत 12 नक्षलवादी मारले गेले. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे.