चौकशी टाळण्यासाठी पंचायत सचिव रजेवर

0
2

एका तरुणीच्या विनयभंग प्रकरणात उसगाव-गांजे पंचायतीचे सचिव मनाजी मोरजकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरात चर्चेला उधाण आले आहे. त्यात चौकशीला समोर जाण्यापूर्वीच पंचायत सचिवाने रजा घेतली आहे. येत्या रविवारी उसगाव-गांजे पंचायतीची ग्रामसभा होणार असून, त्या पंचायत सचिवाच्या कृत्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंचायत क्षेत्रातील घरांच्या सर्वेक्षणासाठी कंत्राट पद्धतीवर कामावर घेतलेल्या तरुणीचा पंचायत सचिवाने विनयभंग केल्याची तक्रार मंगळवारी दाखल झाली होती. त्यानुसार फोंडा पोलिसांनी, तसेच पंचायत संचालकांनी तक्रारीची दखल घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र चौकशीला सामोरे जाण्यापूर्वीच पंचायत सचिवाने रजा घेत असल्याचे पत्र फोंडा गट विकास कार्यालयात पाठविले आहे. त्याचबरोबर मनाजी मोरजकर याने राजकीय दबाव वापरून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.