केंद्र सरकारकडून कर रूपात गोव्याला मिळाले 667 कोटी

0
2

केंद्रीय करांतील गोव्याचा वाटा म्हणून काल केंद्र सरकारने गोव्याला 667.91 कोटी रुपये वितरित केले. केंद्र सरकारने विविध राज्यांना केंद्रीय करांतील वाटा म्हणून 1 लाख 73 हजार कोटी रुपये वितरित केले आहेत.
डिसेंबर 2024 या महिन्यासाठीचा कराचा वाटा हा बराच कमी म्हणजे 89,086 कोटी रुपये एवढाच आहे. मात्र, राज्यांना भांडवली खर्चात वाढ करता यावी तसेच त्यांची विकासकामे व कल्याणकारी योजनांवर जास्त पैसे खर्च करता यावेत यासाठी या महिन्यात जास्त निधी देण्यात आला असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या भरीव आर्थिक पाठिंब्यामुळे गोवा सरकारला साधनसुविधांविषयक भांडवली गुंतवणुकीवर जास्त भर देता येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. त्याचबरोबर सामाजिक कल्याणकारी योजनांसाठीही त्याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.