बनावट सहीने दाखला दिल्याप्रकरणी फोंड्याच्या नगरसेवकाला अटक

0
2

फोंडा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही व पालिकेचा शिक्का वापरून उत्पन्नाचा दाखला सादर केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी गुरुवारी पालिकेचे नगरसेवक शिवानंद सावंत याला अटक केली आहे. यापूर्वी सदानंद सीताराम प्रभुगावकर (सिल्वानगर-फोंडा) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद करून अटक केली होती.
फोंडा पालिकेच्या अधिकाऱ्यांना बनावट उत्पन्नाचा दाखला आढळून आला होता. त्या दाखल्यावर मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांची बनावट सही, पालिकेचे नाव असलेले कागदपत्र व शिक्का वापरल्याचे उघड झाले होते. त्यामुळे मुख्याधिकारी योगीराज गोसावी यांनी रीतसर पोलीस तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुरुवारी नगरसेवक शिवानंद सावंत यांना अटक केली. पोलिसानी केलेल्या चौकशीत सदर दाखला प्रवेश मिळविण्यासाठी गोमेकॉत सादर करण्यात आला होता. नगरसेवक शिवानंद सावंत याने बनावट उत्पादनाचा दाखल आपल्याला दिला असल्याचे सदानंद प्रभुगावकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत स्पष्ट केले होते.