दत्ता नायक यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

0
3

आज होणार सुनावणी

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असलेले उद्योजक, लेखक दत्ता दामोदर नायक यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर काल गुरूवारी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या अर्जावरील निकाल आज शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे. मात्र न्यायालयाने मध्यंतरीच्या काळात त्यांना अंतरिम जामीन द्यावा ही मागणी अमान्य केल्याने त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दत्ता नायक यांनी काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीला आपल्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत धर्माच्या नावाखाली मंदिर, मठात पैसे लुटले जातात असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

नायक यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत मडगाव आणि काणकोण येथे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. काणकोण पोलिसांनी याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला. नायक यांनी अटकपूर्ण जामिनासाठी मडगाव न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्यावरील सुनावणी आज शुक्रवारी (10 जानेवारी) होणार आहे.

पुरोहित वर्गातर्फे तक्रार
वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दत्ता नायक यांच्या विरोधात गोवा पुरोहित संघाने तक्रार दाखल केली आहे. नायक यांच्या विरोधात यापूर्वी याच प्रकरणात गुन्हा नोंद झाला आहे. गोवा पुरोहित संघाने नोंदवलेल्या तक्रारीनुसार दत्ता नायक यांच्याकडून दै. गोमंतकमध्ये 24 डिसेंबर 2024 या दिवशी यांच्याविषयी दिशाभूल करणारा लेख लिहिला गेला होता. यात भगवान परशुराम यांच्याविषयी दिशाभूल करणारी माहिती नायक यांनी लिहिली होती. लेखाचा प्रमुख मुद्दा काही वेगळाच असताना त्यांनी ब्राह्मणवाद उकरून काढला असल्याचा आरोप पुरोहित संघाने केला आहे.