इंडिया आघाडी संपवावी

0
5

ओमर अब्दुल्ला यांचे प्रतिपादन

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काल गुरुवारी इंडिया आघाडी संपवावी अशी मागणी केली. लोकसभा निवडणुकीनंतर याबाबत कोणतीही बैठक झाली नाही. ही युती लोकसभा निवडणुकीपर्यंतच असेल तर ती संपुष्टात यायला हवी. त्याचा ना कुठला अजेंडा आहे, ना कुठले नेतृत्व अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
दिल्लीत आप विरोधक असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी सांगितले. तर विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसची छुपी युती असल्याचे केजरीवल यांनी म्हटले आहे.

आपसोबत 3 पक्ष
विधानसभा निवडणुकीत आपला समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना यूबीटीचा पाठिंबा मिळाला आहे. केजरीवाल यांनी दोन्ही नेत्यांना पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.