नदी परिवहन खात्यात तूर्त कंत्राटी नोकरभरती

0
4

नदी परिवहन खात्यात कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्याची भरती केली जाणार आहे. सरकारच्या मान्यतेसाठी यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. नदी परिवहन खात्याकडून जास्त प्रमाणात महसूल गोळा होत नसल्याने कायमस्वरूपी कर्मचारी भरती थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दिली. नदी परिवहन खात्यात कर्मचाऱ्याची कमतरता असल्याने फेरीबोट सेवांवर परिणाम होत आहे. खात्याच्या महसुलात वाढ होत नसल्याने नवीन कर्मचारी भरती बंद केली आहे, असेही ते म्हणाले.