नुवेतील कार्मेल कॉलेजसमोरील रस्त्यावर एक पादचारी महिलेला दुचाकीची धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला. फातिमा हिलारियो असे त्या मृत महिलेचे नाव असून, ती साइलोभाट चांदर येथील रहिवासी होती. आशिष पटेल हे आपल्या दुचाकीवरून आके-मडगाव येथे निघाले होते, त्याचदरम्यान फातिमा ही रस्ता ओलांडत होती. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने ती ठार झाली. मायणा कुरतरी पोलिसांनी या प्रकरणी पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.