‘दयानंद सामाजिक सुरक्षे’चा लाभ मर्यादित लाभार्थ्यांनाच

0
4

राज्य सरकारने समाजकल्याण खात्याच्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ 1 लाख 40 हजार लाभार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवला जाणार आहे, असे स्पष्ट केले आहे. खात्याकडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा तत्त्वावर पदानुक्रमानुसार प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. त्यासाठी सरकारने डीएसएसएस योजनेत सुधारणा केली आहे. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 1.50 रुपयांपेक्षा जास्त नसावे. 21 वर्षांपेक्षा कमी वयाचे सर्वांत मोठे मूल असलेली विधवा 4 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीसाठी पात्र असेल. इतर सर्व महिला ज्यांच्या पतीचे निधन झाले आहे आणि त्या योजनेंतर्गत पात्र आहेत, त्यांना दरमहा 2,500 रुपये आर्थिक साहाय्य मिळेल. डीएसएसएस अंतर्गत आर्थिक मदतीसाठी पात्र असलेल्या विधवा गृह आधार योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत, असेही सूचनेत म्हटले आहे.