राजेंद्र आर्लेकरांची आता केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती

0
5

केंद्र सरकारने मंगळवारी संध्याकाळी तीन राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली, तर दोन राज्यांमध्ये राज्यपालांची अदलाबदल केली. बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर आरिफ मोहम्मद खान यांना बिहारचे राज्यपाल बनवण्यात आले आहे.

माजी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांना मिझोरामचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. डॉ. हरी बाबू कंभामपती यांना ओडिशाचे राज्यपाल बनवण्यात आले आहे. राज्याचे विद्यमान राज्यपाल रघुवर दास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, जो राष्ट्रपतींनी स्वीकारला होता.