जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. मेंढर क्षेत्रातील बालनोई परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने लष्कराचे एक वाहन थेट 350 फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात वाहनातील 5 जवानांचा मृत्यू झाला. याशिवाय दुर्घटनेत अनेक जवान जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य सुरू करत जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काही जवानांची प्रकृतीची चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 मद्रास लाइट इन्फंट्रीचे वाहन निलम मुख्यालय ते बालनोई घोरा पोस्टकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले. त्या वाहनात 18 सैनिक होते. त्यापैकी 5 जवानांचा मृत्यू झाला. तसेच 10 जण जखमी झाले, त्यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बेपत्ता 3 जवानांचा शोध सुरू आहे.