दिल्ली उपराज्यपालांच्या आदेशानंतर, दिल्ली पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून रोहिंग्या आणि बांगलादेशींविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 175 संशयित बांगलादेशींना दिल्लीबाहेरील जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे भारतीय कागदपत्रे नाहीत त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे बांगलादेशला परत पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी नुकतीच दिल्ली बाह्य जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 175 संशयितांची ओळख पटली असून. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. तपासात कागदपत्रे संशयास्पद असल्याचे आढळून आली. तपासानंतर जे काही तथ्य समोर येतील. त्याआधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दिल्लीकरांनी परिसरात कुणीही संशयित व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.