50 हून अधिक सदनिकांच्या निवासी संकुलांसाठी आता ‘एईडी’ सक्तीचे

0
3

हदयविकाराचा झटका आल्यानंतर वापरले जाणारे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) राज्यात 50 किंवा त्याहून अधिक सनदिका (फ्लॅट) असलेल्या निवासी संकुलांसाठी सक्तीचे करण्यात आले आहे.

राज्यातील हृदयाशी संबंधित आजारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने मोठ्या निवासी संकुलांसाठी ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर असणे अनिवार्य केले आहे. 50 किंवा त्याहून अधिक सनदिका असलेल्या प्रत्येक निवासी संकुलाला एईडीच्या तरतुदीसाठी जागा द्यावी लागेल, जी धोरणात्मकदृष्ट्या निश्चित असेल आणि इमारतीतील रहिवाशांना सहज प्रवेश करता येईल, असे सूचनेत म्हटले आहे. याशिवाय निवासी संकुलातील प्रमुख ठिकाणी सूचना फलकावर कार्डियाक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.