ईडी कारवाईत अडथळा; तिघांविरुद्ध समन्स जारी

0
2

पणजी पोलिसांनी येथील मांडवी नदीतील एका तरंगत्या कॅसिनोमध्ये ईडीच्या कारवाईमध्ये अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात समन्स जारी केले आहेत. मागील आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांच्या एका पथकाने एका तरंगत्या कॅसिनोमध्ये छापा घालून चौकशीला सुरुवात केली होती. त्यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्यात आला. अखेर पणजी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर ईडीचे पथक कॅसिनोमधून बाहेर आले होते. या प्रकरणी ईडीने पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पणजी पोलिसांनी कॅसिनोचे संचालक अशोक वाडिया, कॅसिनो कर्मचारी आरती राजा आणि गोपाळ नाईक यांच्याविरोधात समन्स जारी केले आहेत.