पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी भारतीय राखीव बटालियन (आयआरबी) पोलीस अधिकाऱ्यांशी पोलीस मुख्यालयात काल संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात आलोक कुमार यांनी शिस्तपालनावर भर दिला. सिद्दिकी खान फरार प्रकरणामध्ये एका आयआरबी शिपाई बडतर्फ केल्यानंतर पोलीस महासंचालकांनी आयआरबी पोलीस अधिकाऱ्यांशी प्रथमच संवाद साधला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शिस्त आणि गार्ड ड्युटीच्या मार्गदर्शक सूचनांबाबत काळजीपूर्वक निरीक्षण करून योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. अशी सूचना त्यांनी केली.