‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक आज सादर होणार?

0
3

भारतीय जनता पक्षाने मंगळवारसाठी (दि. 17 डिसेंबर) आपल्या खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास संसदेत सादर केले जाऊ शकते, अशी शक्यता वाढली आहे. तसेच, केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल हे विधेयक सादर करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक देश, एक निवडणुकीसंदर्भात एनडीएच्या सर्व घटक पक्षांची चर्चा झाली आहे आणि सर्व पक्ष यासाठी अनुकूल आहेत. तसेच, विरोधी पक्ष केवळ राजकीय कारणांसाठीच या विधेयकाला विरोध करत आहेत. हे विधेयक जेपीसीकडे पाठवण्यास सरकारची कोणतीही हरकत असणार नाही, असेही संकेत मिळाले आहेत.