दुर्गीणी – धारबांदोडा येथे कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मकसूद खान व झाफर सादिक (चिंबल) हे दोघे बंधू जखमी झाले. जखमींना पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रातून अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले आहे. कुळे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. कारचालकाला डुलकी लागल्याने अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार जीए 07 व्ही 1969 या क्रमांकाची दुचाकी घेऊन दोघेही बंधू कर्नाटक राज्यात जात होते. दुर्गीणी येथे पोहोचताच विरुद्ध दिशेने धावणाऱ्या जीए 08 एम-1177 क्रमांकाच्या कारची धडक दुचाकीला बसून अपघात घडला. अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. जवळच ड्युटीवर असलेल्या फोंडा वाहतूक पोलिसांनी अपघात स्थळावर धाव घेऊन जखमींना इस्पितळात नेण्यास मदत केली. जखमींना अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.