दक्षिण गोव्यात उद्या खंडित वीजपुरवठा

0
2

दक्षिण गोव्यात रविवार दि. 15 डिसेंबर रोजी उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यामुळे सदर दिवशी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील काणकोण, सांगे, सासष्टी व केपे या तालुक्यातील काही भागांत वीजपुरवठा खंडित होणार आहे. परिणामी साळावली धरणातून सांगे, केपे, मुरगाव व सासष्टी या तालुक्यांसह फोंड्यातील शिरोडा व तिसवाडीतील सांतआंद्रे भागातही पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत, वेळ्ळी, बाळ्ळीण, फातर्पा, नेसाय, करमणे, बाणावली, वार्का, कोलवा, नावेली, तसेच वेर्णा औद्योगिक वसाहत, धारबांदोडा तालुक्याचा काही भाग किर्लपाल, दाभाळ ग्रामपंचायत, शिगाव-कुळे, मोले व फोंडा तालुक्यातील काही भाग, पंचवाडी ग्रामपंचायत व शेळपे येथील साळावली वॉटर वर्क्स येथील 110 केव्ही ग्राहकांना वीजपुरवठा होऊ शकणार नाही. तसेच 15 डिसेंबर रोजी साळावलीतून पाणीपुरवठा होणार नाही, तर 16 रोजी मर्यादित पाणीपुरवठा होणार आहे.